कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सन २०२१-२२ या वर्षाचा अर्थसंकल्प आज (सोमवार) संसदेत सादर केला. यावर क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजीव परीख यांनी म्हटले आहे की, केंद्रीय अर्थसंकल्पात परवडणाऱ्या गृह प्रकल्पांना कर कपातीतून एक वर्षाची मुदतवाढ व गृहकर्जासाठी दीड लाखाच्या सवलतीत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प गृहनिर्माण क्षेत्राला फारसा दिलासा देणारा नाही. पेट्रोल आणि डिझेल दरामध्ये होणारी संभाव्य दरवाढ यामुळे बांधकाम साहित्यात देखील दरवाढ होणार आहे. याचा भार पर्यायाने ग्राहकांवर पडणार आहे. देशाला सर्वाधिक रोजगार देणाऱ्या क्षेत्राचा फारसा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही.