कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापुरातील नुकसानीच्या पंचनाम्याकरीता हॉटेल व्यवसाय सुरू असल्याबाबतचा सरपंचाच्या सहीचा नाहरकत दाखल देण्यासाठी ३ हजारांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या शिपायाला  मंगळवारी अटक केली  होती.  त्याला आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  

शिवाजी दत्तात्रय चौगले (वय ४३, रा. शिवनगर, आंबेवाडी, ता. करवीर) असे अटक केलेल्या शिपायाचे नांव आहे.  त्याला कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती.  आज त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

कोल्हापुरात जुलै महिन्यात आलेल्या महापुरामध्ये तक्रारदाराच्या आंबेवाडीतील  हॉटेल, परमिट रूममध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे  नुकसानीचा पंचनामा करण्याकरिता सरपंचाच्या सहीचा नाहरकत दाखल्यासाठी तक्रारदाराने ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. त्यानंतर हा दाखल देण्यासाठी शिपाई शिवाजी चौगले यांनी तक्रारदाराकडे ३ हजारांची लाचेची मागणी केली होती.