मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील  उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलबार हिलमध्ये घर खरेदीचा विक्रमी व्यवहार  झाला आहे. हा व्यवहार बांधकाम क्षेत्रात  चर्चेचा विषय ठरला आहे. मलबार हिलमध्ये तब्बल १ हजार कोटींचा घरखरेदीचा व्यवहार झाला आहे.  हे घर डी-मार्ट रिटेल चेन चालवणाऱ्या एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी विकत घेतले आहे.

राधाकृष्ण दमानी यांनी ३१ मार्चला घर खरेदीचा व्यवहार केला आहे. त्यांनी या घरासाठी ३० कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली आहे. ५७५२.२२ चौरस फुटांच्या या घराची किंमत  बाजारभावानुसार ७२४ कोटी रुपये आहे.  राधाकृष्ण दमानी हे ‘डी-मार्ट’चे मालक आहेत. भारतातीलल्या अनेक लहान मोठ्या शहरांमध्ये ‘डी-मार्ट’ च्या शाखा आहेत. ‘डी-मार्ट’मध्ये किराणा मालासह अनेक  जीवनावश्यक वस्तू मिळतात. ‘डी-मार्ट’ला  ग्राहकांचीही मोठी पसंती मिळत आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीत राधाकृष्ण दमानी यांनी स्थान मिळवले आहे. पांढरा शर्ट आणि पांढरी पँट असा पेहराव असणाऱ्या दमानी यांना मिस्टर व्हाईट अँड व्हाईट म्हणून ओळखले जाते.