Published September 28, 2020

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मोटरसायकलला कारची धडक लागून २ तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. प्रवीण बाबुराव पोवार (वय ३०, रा. सडोली दुमाला, ता. करवीर) आणि तुषार पाटील अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी प्रवीण पोवार याने अज्ञात कार चालकाच्या विरोधात आज (सोमवार) शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, प्रवीण पोवार आणि त्याचा मित्र तुषार पाटील हे दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून घरगुती कामानिमित्त कोल्हापुरातील तावडे हॉटेल जवळ आले होते. काम आटपून ते घराकडे जात होते. ते कावळा नाक्याजवळ आले असता, त्यांच्या पाठीमागून आलेल्या एका कारची त्यांना जोरदार धडक लागली. त्यात हे दोघे गंभीर जखमी झाले. मात्र धडक देणाऱ्या कार चालकाने कारसह पलायन केले. याप्रकरणी प्रवीण पोवार यांनी अज्ञात कार चालकाविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.

October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023
October 3, 2023