कोल्हापूर (प्रतिनिधी) : मटका प्रकरणातील मोक्याची कारवाईमध्ये सध्या फरारी असलेला कोल्हापूरातील सम्राट कोराणे आणि इचलकरंजीतील संजय तेलनाडे या दोघांच्या शोधासाठी दोन नव्या पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश दिल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

इचलकरंजी येथील गावभाग शिवाजीनगर आणि शहापूर या तीनही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्व अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. हे येत्या आठ दिवसात बंद झालेच पाहिजेत. असे आदेश बलकवडे यांनी  संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबरोबरच गुटखा कारवाई वेळी कसूर केल्याबद्दल तसेच अवैध व्यावसायिकांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवल्याबद्दल दोन पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्याचेही पोलीस अधिक्षक बलकवडे यांनी सांगितले.

इचरकंजी परिसरात मटक्यायासह अन्य अवैध व्यवसाय चालवणाऱ्या संजय तेलनाडे याच्यावर पोलिसांनी मोकाची कारवाई केली आहे. याबरोबरच कोल्हापुरातील सम्राट कोराणे याच्यावरही पोलिसांनी मोका कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, ही कारवाई झाल्यापासून संजय तेलनाडे आणि सम्राट कोराणे हे दोघेही फरार झाले आहेत. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

मात्र अद्यापही सापडलेले नाहीत. त्यामुळे सम्राट संजय तेलनाडे आणि सम्राट कोराणे याना तात्काळ अटक करण्यासाठी नव्याने दोन पथकांची नियुक्ती करण्यात आल्याचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.