विवाहितेवर लैंगिक अत्याचार, ब्लॅॅकमेलप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी

0
111

कोल्हापूर (प्रतिनिधी) : विवाहितेचे लैंगिक शोषण करून अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी इम्रान नियाजउल्ला बागवान (वय ४०, रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) आणि अरिफ शेख (३५, रा. मुक्त सैनिक वसाहत) यांना अटक करण्यात आली होती. त्यांना ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

कोल्हापुरातील एका उपनगरात ब्युटीपार्लर चालविणाऱ्या विवाहितेला संशयित बागवान याने पिण्याच्या पाण्यातून गुंगीचे औषध दिले आणि सुमारे दोन वर्षे लैंगिक अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ बनवले आणि ते दहा लाखाच्या खंडणीची मागणी करत व्हायरल करण्याची धमकी दिली. अखेर या पीडितेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. न्यायालयाने त्यांना ९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.