शिरोली दुमाला, गणेशवाडी येथे कोरोनामुळे दोघांचा मृत्यू 

0
88

सावरवाडी (प्रतिनिधी) : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनाचा कहर वाढतच आहे. आज (रविवार) शिरोली दुमाला आणि गणेशवाडी या दोन गावात कोरोनामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यु झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

शिरोली दुमाला गावातील एक तर गणेशवाडी गावातील एका  शेतकऱ्याचा आज कोल्हापूरच्या कोविड सेंटरमध्ये मृत्यू झाला. या घटनेमुळे दोन्ही गावातील गल्ल्या सील केल्या आहेत. दरम्यान, कोरोनाचे बहिरेश्वर, बीडशेड, महे या गावात पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.