पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी दोघांना अटक…

0
84

पुणे (प्रतिनिधी) : गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.  या आत्महत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी यवतमाळ आणि बीडमधून दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोन्ही तरुणांची कसून चौकशी केली जाणार आहे.

यावेळी पुणे पोलीसांनी यवतमाळ आणि बीडमध्ये जाऊन दोघाजणांना ताब्यात घेतले आहे. या दोघांना सध्या चौकशीसाठी ताब्यात घेतले असून यामधील एकजण हा अरुण राठोडचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आणखी नवीन माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरुण राठोड हा गेल्या काही दिवसांपासून गायब आहे. कथित ऑडिओ क्लिपमध्ये अरुण राठोडचा आवाज असल्याचे सांगितले जात आहे.