कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्हा न्यायालयात आज (शुक्रवार) डॉक्टर दिनानिमित्त ४१८ जणांनी बूस्टर डोसचा लाभ घेतला. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. सी. चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा विधीज्ञ संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कोविशिल्ड या बूस्टर डोसच्या लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा न्यायालयातील न्यायिक अधिकारी, जिल्हा विधीज्ञ संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, विधीज्ञ संघाचे कर्मचारी आणि न्यायालयातील कर्मचारी अशा एकूण ४१८ जणांनी लसीकरणाचा लाभ घेतला. लसीकरणाचे आयोजन वैद्यकीय अधिकारी कुटुंब कल्याण केंद्र क्रमांक ५ कसबा बावडा येथील डॉ. सोनाक्षी पाटील, अनुजा रूकडीकर, मोरे, जाधव, माने, धनवडे, शिंदे, शेटके, मोकाशे, दाते, काळे, फडतारे यांच्यामार्फत करण्यात आले.

कोविशिल्डचा तिसरा बुस्टर डोस देण्यासाठी प्रीतम पाटील (सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), विधीज्ञ संघाचे अध्यक्ष गिरीश खडके, विवेक घाटगे  (सदस्य, बार कौन्सिल महाराष्ट्र आणि गोवा) आणि सर्व पदाधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.