क्षुल्लक कारणावरून मावशीने मुलीवर ओतले उकळलेले पाणी  

0
27

मुंबई (प्रतिनिधी) : कपडे नीट न धुतल्याच्या रागातून ९ वर्षीय मुलीवर मावशीने उकळलेले पाणी ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी   मालवणी पोलिसांनी ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे. मुलीच्या खांद्यावर, कान, मान आणि पायावर मोठ्या जखमा झाल्या असून तिला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे.

आईला मानसिक आजार आहे. त्यामुळे मावशीकडे राहायला असते. कपडे नीट धुतले नाहीत, म्हणून मावशीने रागाच्या भरात अंगावर गरम पाणी ओतल्याचे मुलीने पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. तर मुलीला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिची प्रकृती स्थिर आहे, असे पोलिसांनी सांगितले. तर मुलीला तिच्या मोठ्या भावाकडे सोपवण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी महिलेला अटक करून तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.