आजरा (प्रतिनिधी) : आजरा साखर कारखान्याचा सन २०२१-२२ या वर्षाचा २३  वा गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ डॉ. आनंद महाराज,  रुग्वेदी भागवत मठ,  हत्तरगी यांच्या प्रमुख उपस्थितीत  चेअरमन सुनिल शिंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली  संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाला.

बॉयलर होमहवन व पुजन संचालक दिगंबर देसाई व त्यांच्या सुविद्य पत्नी शालनताई देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कारखान्याचे संचालक मंडळ, सदस्य,  डॉ. तानाजी भोसले,  कार्यकारी संचालक,  अधिकारी,  कर्मचारी,  कामगार व कार्यकर्ते,  कंत्राटदार उपस्थित होते.