जवाहर साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन संपन्न…

0
60

हुपरी (प्रतिनिधी) : हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील जवाहर शेतकरी सहकारी कारखान्याचा सन २०२० ते २०२१ या २८ व्या गळीत हंगामासाठी बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आला. यावेळी कारखान्याचे संस्थापक चेअरमन आणि माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते तर आमदार आणि संचालक प्रकाश आवाडे, सौ. किशोरी आवाडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

जवाहर कारखान्याने मागील सन २०१९-२०२० या गळीत हंगामात १५ लाख ६ हजार ६१० टन उसाचे गाळप करुन १८ लाख १८ हजार ९०० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले. कारखान्याकडे चालू गळीत हंगामासाठी २० हजार ८६१ हेक्टर उसाची नोंद झाली आहे. या हंगामासाठी सर्व सभासद, उस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊस पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here