महसूल विभागात बोगस ‘एनए’ची ऑर्डर बेकायदेशीर : जिल्हा नागरी कृती समितीचा आरोप

0
24

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात महसूल विभागात बोगस एनए आर्डर करून बेकायदेशीर खरेदी आणि विक्रीचे व्यवहार सुरू आहेत. असा आरोप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्या वतीने करण्यात आला. तसेच एनए बोगस आर्डरचा खुलासा करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आज (शुक्रवार) कृती समितीच्या वतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळातर्फे निवासी उपजिल्हाधिकारी शंकर जाधव यांना देण्यात आले.

निवेदनात, बनावट आदेशाची आपण चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार नसाल तर सदर बनावट आदेशाचा घोटाळा झालेला नाही. असे जाहीर करुन जनतेतील संभ्रम दूर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी शंकर शेळके, चंद्रकांत सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील, रमेश मोरे, विनोद डुणूंग, भाऊ घोडके, रमाकांत आंग्रे, विलास भोंगाडे, अशोक पवार, राजू मालेकर, महेश जाधव उपस्थित होते.