कोलोलीत ५० जणांचे रक्तदान

0
52

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कोलोली येथे शिवजयंतीनिमित्त परिवर्तन सामाजिक संस्थेतर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात गावातील ५० जणांनी रक्तदान केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती विकास पाटील, पोलिस पाटील शुभांगी जाधव, उप सरपंच पंडीत तांबवेकर, अशोक जाधव, सागर जाधव, अंकुश पाटील आदी उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते रविंद्र जाधव यांनी शिबिराचे नियोजन केले होते. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास संस्थेकडून भेट वस्तू देण्यात आली.