कळे येथील शिबीरात  ७५ रक्तदात्यांचे रक्तदान…  

0
49

कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे (ता.पन्हाळा) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कळे पोलिस ठाणे, पश्चिम पन्हाळा ग्रामीण पत्रकार संघ, पोलिस पाटील संघटनेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात परिसरातील ७५ जणांनी रक्तदान केले. हे शिबीर कळे पोलिस ठाणे येथे पार पडले. याचे उदघाटन कळे पोलिस ठाण्याचे सपोनि. प्रमोद सुर्वे यांचे हस्ते करण्यात आले.

यावेळी रक्तदान करणाऱ्या व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व कार्ड देण्यात आले. तसेच हे रक्तसंकलन कोल्हापूर येथील वैभवीलक्ष्मी ब्लड बॅकेने केले. यावेळी पंचाहत्तरवे रक्तदान करणारे कळे पोलिस ठाण्याचे गोपनीय विभागाचे अशोक निकम यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी कळे पोलिस ठाण्याचे पदाधिकारी, कर्मचारी, पोलिस पाटील संघटनेचे पदाधिकारी, ग्रामीण पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.