संभापूर येथील शिबिरात १०२ जणांचे रक्तदान

0
193

टोप (प्रतिनिधी) : राज्यात सर्वत्र रक्ताचा पुरवठा कमी असल्याने राज्य सरकारकडून रक्तदान करण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे. त्यानुसार, संभापूर येथील सावकर ग्रुपच्या वतीने १६ व्या वर्धापनदिनानिमित्त सरपंच प्रकाश झिरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आज (सोमवार) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात १०२ जणांनी रक्तदान केले.

मिरज येथील एम. एस. आय. रक्तपेढीच्या वतीने संकलन करण्यात आले. या शिबिरास जनसुराज्य पक्षाचे नेते अशोकराव माने यांनी भेट दिली. या वेळी प्रकाश झिरंगे, देवदुत झिरंगे, तानाजी भोसले, सनि पाटील, आकाश माडेकर, दिनेश निखम, सूरज झिरंगे, प्रमोद झिरंगे, अवधूत झिरंगे, तुकाराम झिरंगे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.