Published November 3, 2020

टोप (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असल्याने सामाजिक भान ठेऊन टोप येथील ‘व्ही मेम्बर्स’ या युवकांच्या ग्रुपने आपल्या ग्रुपच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीरास चांगला प्रतिसाद मिळाला असून, १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

या ग्रुपच्या पहिल्या वर्धापनदिनी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी १०५ लोकांनी रक्तदान केले होते. तर यावेळीही १०५ लोकांनी रक्तदान केले. रक्तदानासह गोरगरिबांना मदतीचा हात देण्यातही हा ग्रुप अग्रेसर आहे. जीवनधारा रक्तपेठीतर्फे या शिबिराचे नियोजन करण्यात आले.

यावेळी अमृत पाटील, स्वप्नील वाघवे, सुशांत पाटील, सुरज पाटील, पृथ्वीराज घोलप, गणेश शिंदे, शुभम भोसले, सुहास पाटील, शुभम पाटील, पियुष पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, आशुतोष पाटील आणि ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023