जनाबाई पाटील यांच्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त शिरोली येथे शनिवारी रक्‍तदान शिबिर

0
109

कोल्‍हापूर  (प्रतिनिधी) : गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक विश्‍वास नारायण पाटील (आबाजी) यांच्‍या मातोश्री कै.जनाबाई नारायण पाटील (तार्इ) यांच्‍या आकराव्‍या स्‍मृतिदिनानिमित्‍त शनिवारी (दि.१९) रक्‍तदान शिबिर व व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले आहे. शिरोली दु. (ता.करवीर)  येथे  सकाळी ९  वाजता रक्‍तदान शिबिरास प्रारंभ होणार आहे.  

अॅस्‍टर आधार हॉस्पिटलचे डॉ. अजय केणी यांचे ‘कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेमध्ये घ्‍यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. हे व्याख्‍यान शनिवारी सायंकाळी ६ वाजता श्री. बलभिम विकास सेवा संस्‍थेच्‍या प्रांगणात होणार आहे. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे. तसेच रक्‍तदान शिबिरास तरूणांनी पुढाकार घेऊन रक्‍तदान करावे, असे आवाहन विश्‍वास नारायण पाटील फौंडेशनच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.