फेजिवडे येथे असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्या वतीने रक्तदान शिबिर

0
84

राधानगरी (प्रतिनिधी) : फेजिवडे (ता.राधानगरी) येथे महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटनेच्या शाखेचे उद्घाटन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अंजुम भाई देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संघटनेच्या नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. राधानगरी तालुका अध्यक्ष म्हणून नदीम चोचे यांची निवड करण्यात आली. 

याप्रसंगी रक्तदान शिबिर घेण्यात आले. संस्थापक अध्यक्ष, सचिव, सेक्रेटरी, जिल्हाध्यक्ष यांच्यासह ५१ सदस्यांनी रक्तदान केले

यावेळी संघटनेचे जनरल सेक्रेटरी बाळासाहेब कांबळे, सहसचिव इरफान कुरणे, जिल्हा अध्यक्ष प्रविण बनसोडे, अन्सार देसाई (काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष), फेजिवडे गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामस्थ, कामागार आदी उपस्थित होते.