मंडलिक कारखान्यावर रक्तदान शिबीर उत्साहात…

हमिदवाडा (प्रतिनिधी) : सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या ८६ व्या जंयती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.

छ. प्रमिलाराजे रूग्णालय, कोल्हापूर यांच्या रक्तदान पेटी मार्फत रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये कारखान्याचे कर्मचारी, सभासद तसेच युवकांनी कोरोनाच्या काळातही मोठ्या उत्साहाने या शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराचे उद्घाटन राधानगरी भुदरगडचे माजी आ. दिनकरराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कोरोनाच्या प्रादुर्भावात सीपीआर मार्फत प्रथमच रक्तदान शिबिर हमिदवाडा परिसरात आयोजित करण्यात आले. यावेळी १८२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

सीपीआर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. शितल हारूगडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ राजेश होडगे,  विजया कुंभार, मंडलिक कारखान्याचे आरोग्य विभागाचे डॉ.विजय चौगुले यांनी सहभाग घेतला.

यावेळी कारखान्याचे चेअरमन खा. संजय मंडलिक, व्हाईस चेअरमन बंडोपंत चौगले, युवा नेते वीरेंद्र मंडलिक, एन. वाय. पाटील, कर्मचारी, सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

Live Marathi News

Recent Posts

कोरोना अपडेट : दिवसभरात १६०१ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल…

6 hours ago