टोप येथील शिबीरात १०५ जणांचे रक्तदान…

0
57

टोप (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रक्तांचा पुरवठा कमी असल्याने सामाजिक भान ठेवुन टोप येथील “वि मेम्बर्स” या ग्रुपने आपल्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे औचित्य साधुन रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबीराला चांगला प्रतिसाद मिळाला असून यामध्ये १०५ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.

या ग्रुपच्या पहिल्या वर्धापनदिनी रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यावेळी १०५ लोकांनी रक्तदान केले होते. तर यावेळीही १०५ लोकांनी रक्तदान केले. रक्तदानासह गोरगरिबांना मदतीचा हात देण्यातही हा ग्रुप अग्रेसर आहे. अर्पण रक्तपेढीतर्फे या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते.

यावेळी अमृत पाटील, स्वप्नील वाघवे, सुशांत पाटील, सुरज पाटील, पुर्थ्वीराज घोलप, गणेश शिंदे, शुभम भोसले, सुहास पाटील, शुभम पाटील, पियुष पाटील, विजय पाटील, उमेश पाटील, आशुतोष पाटील, ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते.