उद्या धमाका ! ; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा प्रोमो रिलीज

0
75

मुंबई (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीच्या सरकारला वर्ष पूर्ण होत आले आहे. यानिमित्त सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ‘अभिनंदन मुलाखत’ घेतली आहे. या मुलखतीचा प्रोमो आज (गुरुवार) ट्विटद्वारे त्यांनी रिलीज केला असून, ‘उद्या धमाका’ असे लिहिले आहे. 

या मुलाखतीमध्ये नेमके काय असणार, मुख्यमंत्री नेमके काय बोलणार ? याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरेंना राऊत काही परखड प्रश्न विचारताना दिसत आहेत. या प्रश्नांना मुख्यमंत्री कसे सामोरे जातात, मुख्यमंत्री काय उत्तरे देणार त्याची झलक दिसत आहे.