ब्लॅकमेकर रेणू शर्माची आता माघारीची भाषा..!

0
208

मुंबई (प्रतिनिधी) : एक काम करा तुम्ही सर्वांनी मिळून निर्णय घ्या, कोणतीही माहिती जाणून न घेता माझ्यावर सर्वजण थेट आरोप करत आहेत. तर सर्वांनी मिळून ठरवा. तुमच्या इच्छेनुसार मी माघारी घेते, अशा प्रकारचे ट्विट करत रेणू शर्मा यांनी माघारीची भाषा केली आहे.

राज्यात धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर गायिका रेणू शर्मा या सराईत ब्लॅकमेलर असल्याचे समोर आले. धनंजय मुंडे यांनी आरोप फेटाळून लावल्यानंतर भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्यासह मनसे पदधिकारी मनीष धुरी आणि जेट एअरवेजमध्ये अधिकारी असलेल्या रिझवान कुरेशी यांनी यापूर्वीदेखील रेणू शर्मा यांनी आम्हाला अशाचपद्धतीने ब्लॅकमेल केले असल्याचे माध्यमांसमोर जाहीर केले आहे.