गारगोटीमध्ये भाजपाचे ‘टाळेठोक’ आंदोलन…

0
225

गारगोटी (प्रतिनिधी) :  भुदरगड भाजपाच्या वतीने गारगोटी येथील महावितरण कार्यालयला आज (शुक्रवार) टाळेठोक आंदोलन केले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. विनायक परुळेकर यांनी, कोरोनाच्या काळातील वीज बिले माफ करून १०० युनिट पर्यंत वीज बिले माफी करावीत, असे सांगितले. जिल्हा उपाध्यक्ष प्रविणसिंह सावंत यांनी, आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला. यावेळी महावितरण कंपनीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी विद्यार्थी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पार्थ सावंत, गारगोटीचे सरपंच संदेश भोपळे, उपाध्यक्ष सुनील तेली, भगवान शिंदे, प्रकाश वासकर, युवराज पाटील, सचिन देसाई, रमेश रायजदे, सदामामा देवर्डेकर, सुहास कांबळे आदी उपस्थित होते.