कागल (प्रतिनिधी) : अन्यायी वीज बील वसुली थांबवावी. तसेच ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडू नये. या मागणीसाठी आज (शुक्रवार) भाजपाच्यावतीने कागल ल उपविभागिय कार्यालयाचे अभियंता गणेश पोवार यांना दिले.  तसेच महावितरणने जबरदस्तीने कोणतेही पाऊल उचलल्यास तिव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला.

निवेदनातील म्हटले आहे की,  कोरोनाच्या काळात लॉकडाउन करण्यात आले होते. या काळात  वीज बिले भरमसाठ वाढून आलेली आहेत. लॉकडाऊन काळात नागरिकांचे रोजगार बुडाले. व्यवसायात मंदी होती. त्यामुळे नागरिकांना ती भरणे शक्य नव्हते. यासाठी जनसामान्यांमधून  बिले माफ करणे बाबत वेळोवेळी मागणी केली जात होती. याबाबत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या नेतृत्वाखाली वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. शासनाने सर्वसामान्य नागरिकांना वीज बिलामध्ये सवलत देऊन दिलासा देऊन दिवाळीपूर्वी गोड बातमी देऊ, असा शब्द  दिला होता. आता वीज बिले भरलीच पाहिजेत असे म्हणत शासनाने दिलेला शब्द मोडला आहे. बिले न भरल्यास कनेक्शन तोडण्याबाबत ग्राहकांना नोटीस दिल्या आहेत. हे पुर्णपणे चुकीचे व अन्यायकारक आहे.

शासनाने जाहीर केल्याप्रमाणे ही वीज बिले माफ होईपर्यंत महावितरणकडून सुरू असलेली अन्यायी वीज बील वसुली थांबवावी. ग्राहकांना लागू केलेल्या वीज कनेक्शन कट करण्याबाबतच्या नोटीस मागे घ्याव्यात. अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष संजय पाटील, जिल्हा सरचिटणीस एम. पी. पाटील,  शाहूचे संचालक युवराज पाटील, प्रा. सुनिल मगदूम, सुशांत कालेकर, नंदकुमार माळकर, आप्पासो भोसले, सुशांत कालेकर, असिफ मुल्ला, हिदायत नायकवडी आदींच्या सह्या आहेत.