…त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची भाजपची तयारी : काँग्रेसचा आरोप

0
131

मुंबई (प्रतिनिधी) : देशात विरोधी पक्षांची सरकारं टिकू दिली जात नाहीत, आणि त्यासाठी कोणत्याही पातळीवर जाण्याची मोदी सरकारची व भाजपची तयारी असते, हे वेळोवेळी आपण पाहिलेलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी ज्या पद्धतीचे प्रयत्न झाले. राजस्थानमध्ये काँग्रेसचं गेहलोत सरकार पाडण्यासाठी कशाप्रकारे प्रयत्न झाले, हे आपण पाहिलेलं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज (रविवार) पत्रकार परिषदेत केली.

सचिन सावंत म्हणाले, ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात जाणीवपूर्वक निर्माण केले जात आहे, हे वातावरण देश पातळीवरती जिथे जिथे विरोधी पक्षांची सरकारं आहे, तिथं निर्माण केले जाते. साम, दाम, दंड, भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत सत्ता परिवर्तन करायचं, सत्ता बळकवायचा भाजपचा सातत्याने प्रयत्न असतो. यासाठी केंद्रीय यंत्रणांचा दुरूपयोग केला जातोय, हे वेळोवेळी दिसून आले आहे. वर्षभरापासून महाविकासआघाडी सरकार ज्या पद्धतीचे अत्याचार केंद्र सरकारकडून सहन करत आहे. वेळो वेळी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, ही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकऱणात तीन-तीन तपास यंत्रणांना आणलं गेलं. मुंबई पोलिसांची बदनामी केली गेली. एकंदरीतच या सर्व यंत्रणासाठी राजकीय स्वार्थासाठी वापर केला जातो आहे, यामध्ये कुठलीही शंका नाही, असे सावंत यांनी म्हटले आहे.