गडहिंग्लजमध्ये सत्तांतरानंतर भाजपचा जल्लोष

0
51

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राज्यात अभूतपूर्व घडामोडीनंतर गुरुवारी रात्री नाट्यमयरीत्या शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर गडहिंग्लज येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील दसरा चौकात जल्लोष करण्यात आला. पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आणि साखर-पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष राजेंद्र तारळे, नागेश चौगुले, प्रीतम कापसे, संदीप नाथबुवा, युवराज बरगे, सतीश हळदकर, अमर पोटे, संदीप रोटे, सचिन घुगरे, कुमार पाटील आदींसह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.