सांगली (प्रतिनिधी) : काही दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील बोरगाव येथे उपसरपंच पदाच्या निवडीवेळी ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग जनार्दन काळे यांचा निर्घृण करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी आतापर्यंत १४ जणांना अटक केली आहे.  या हत्येप्रकरणी पोलिसांनी आज भाजपचे कवठेमहांकाळ तालुकाध्यक्ष जनार्दन एकनाथ पाटील याला अटक केली आहे. आहेत, तर २५ जण अद्याप फरार आहेत.

बोरगाव येथील उपसरपंच पदाच्या निवडीवेळी वाद होऊन सदस्य पांडुरंग काळे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी त्यांचा भाऊ अंकुश काळे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात ३९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बरेच आरोपी फरार झाले होते. हत्येच्या घटनेला १० दिवस उलटून गेल्यानंतरही पोलिसांनी केवळ १४ जणांना अटक केली आहे. तर २५ आरोपी अद्याप फरार आहेत, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. गेल्या दहा दिवसांत आरोपींनी पोलिसांना अनेकदा गुंगारा दिला आहे.