राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ कोल्हापुरात भाजपचे आंदोलन…

0
80

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवर केलेल्या वक्तव्याबाबत आज हुकुमशाही पद्धतीने राणे यांना अटक करण्यात आली. याच्या निषेधार्थ भाजपा कोल्हापूरच्या वतीने बिंदू चौक येथे आज (मंगळवार) जोरदार निदर्शने करून सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

यावेळी बिंदू चौक येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली येथे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी सरचिटणीस हेमंत आराध्ये, भाजपा प्रवक्ते अजित ठाणेकर, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस गणेश देसाई, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, मारुती भागोजी, सचिन तोडकर, अजित सूर्यवंशी, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, विजय खाडे-पाटील, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.