पश्चिम बंगालमध्ये बॉम्ब हल्ल्यात भाजप कार्यकर्ते जखमी

0
80

कोलकाता (वृत्तसंस्था) : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पुन्हा एकदा बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात भाजपचे ६ कार्यकर्ते जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. शुक्रवारी रात्री लग्नावरुन परतत असताना काही अज्ञातांकडून बॉम्बहल्ला करण्यात आला. जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या हल्ल्यात  शोवन देबनाथ, विक्रम, अर्पण, स्वपन, महादेव अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.  

जखमी भाजप कार्यकर्त्यांनी हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेस असल्याचा आरोप केला आहे. लग्नातून परतत असताना बॉम्बहल्ला केल्याचा दावा त्यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. दरम्यान तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने भाजप नेते वरुण प्रामाणिक यांनी हा बॉम्ब तिथे ठेवला होता, ज्यामध्ये त्यांचे ६ कार्यकर्ते जखमी झाले आहेत.