कोल्हापुरात भाजपतर्फे वाढीव वीजबिलांची होळी (व्हिडिओ)

0
89

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव वीजबिल माफ केले जात नसल्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने राज्यभरात आज (सोमवार)  गावपातळीवर व शहराच्या ठिकाणी वीजबिल होळी आंदोलन करण्यात येत आहे.  कोल्हापुरातही भाजपच्या वतीने ताराबाई पार्क येथील मुख्य वीज वितरण कार्यालयासमोर भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली वीजबिलांची होळी करुन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला.

 

 

यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महाविकास आघाडीचा धिक्कार असो, फसवी, खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वीजबिले माफ झाली पाहिजेत, पलटी सरकारचा धिक्कार असो, भरणार नाही, भरणार नाही वीजबिले भरणार नाही, अशा घोषणा देण्यात आल्या.

आंदोलनात सरचिटणीस विजय जाधव, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, सचिन तोडकर, दिपक काटकर, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे- पाटील, गायत्री राऊत, दिलीप बोंद्रे, प्रग्नेश हमलाई, डॉ.राजवर्धन, भरत काळे, सुशांत पाटील यांच्या सह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.