विधान परिषदेच्या तोंडावर भाजपला धक्का : मोठा नेता काँग्रेसमध्ये  

0
1095

नागपूर (प्रतिनिधी) : नागपुरात विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेते रवींद्र उर्फ छोटू भोयर यांनी आज (सोमवार) काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसच्या शहर कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला काँग्रेसचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. भोयर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

आरएसएसचे स्वयंसेवक राहिलेले नगरसेवक छोटू भोयर मंगळवारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.

जितकी मते भाजपकडे अधिक आहेत, तेवढ्याच मतांनी त्यांचा उमेदवार पराभूत होईल. निवडणूक लढवणार नसल्याचे बावनकुळे यांनी म्हटले होते. पण ते कार्यकर्त्यांशी खोटे बोलत होते. त्यांनी तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले. ज्या कारणांसाठी त्यांना विधानसभेत तिकीट नाकारले, ती कारणे संपली का ? हे भाजपने जाहीर करावे, अशी मागणीही भोयर यांनी यावेळी केली.