गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कागल येथील हसन मुश्रीफ फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक सराव प्रश्नपत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. याचा गडहिंग्लज शहर भाजपच्या वतीने आज (शुक्रवार) जाहीर निषेध करून तहसीलदार दिनेश पारगे यांना निवेदन देण्यात आले.

याबाबत गडहिंग्लज तालुका भाजपचे उपाध्यक्ष चंद्रकांत सावंत म्हणाले की, हसन मुश्रीफ फाउंडेशनने गंभीर चूक केली आहे. या प्रश्न पत्रिकेत क्र.४२ च्या प्रश्नामध्ये  छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला आहे. ही गंभीर चूक असून ज्याने कोणी ही चूक केली आहे, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. या मागणीचे निवेदन तहसीलदार दिनेश पारगे यांना देण्यात आले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.