कोणाच्याही प्रेमात पडू नका : भाजप खासदाराच्या सुनेनं कापली हाताची नस

0
265

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आता माझ्या जगण्याचा काहीच अर्थ नसून कोणाच्याही प्रेमात पडू नका, असा आशयाचा व्हिडिओ करून भाजप खासदाराच्या सुनेनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंजमधील भाजपचे खासदार कौशल किशोर यांची सून अंकिता किशोरने हाताची नस कापली.  

अंकिताला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. तिच्या जिवाला आता कोणताही धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. दरम्यान, आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी अंकिताने रविवारी एक व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. यात अंकिताने पती आयुषवर गंभीर आरोप करून आपली फसवणूक झाल्याचे म्हटले आहे.

घरासमोरच ब्लेडने मी माझ्या हाताची नस कापली. तेव्हा पती आयुष आणि सासू अंगणामध्ये फेऱ्या मारत होते. कोणीही मला आडवण्याचा प्रयत्न केला नाही. दीड तासानंतर पोलीस घटनास्थळी आले, असे अंकिताने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.