नवी दिल्ली (प्रतिनिधी) : भाजपचे खासदार राम स्वरूप शर्मा (वय ६२) यांनी दिल्लीतील खासदार निवासात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार आज (बुधवार) सकाळी ८.३० वाजता समोर आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

शर्मा यांच्या निवासस्थानातील कर्मचाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.  त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी शर्मा यांचा मृतदेह लटकेल्या अवस्थेत आढळून आला. राम स्वरूप शर्मा भाजपचे खासदार आहेत. ते हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवड आले आहेत. दिल्लीतील आरएलएम रुग्णालयाजवळ खासदारांचे निवासस्थान आहे. याच खासदार निवासात शर्मा यांनी आत्महत्या केली.

दरम्यान, खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची घटना ताजी असताना   आणखी एका खासदाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राजधानी दिल्लीत खळबळ उडाली आहे.