कोरोनामुळे भाजप आमदार किरण माहेश्वरी यांचे निधन

0
79

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या प्राणघातक विषाणूमुळे आतापर्यंत अनेकांणा आपले प्राण गमवावे लागले आहेत. सर्व सामान्य जनतेपासून ते दिग्गज व्यक्तींना देखील या महामारीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान भाजपच्या आमदार किरण माहेश्वरी यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघात शोक व्यक्त करण्यात येत आहे. नुकताच त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. 

गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर हरियाणा येथील गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावल्याने उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. कोरोनामुळे निधन झालेल्या  राजस्थानच्या त्या दुसऱ्या आमदार आहेत.