कोल्हापूर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी महिला आघाडी कोल्हापूर महानगर यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा ओर समर्पण अभियानातंर्गत विविध कार्यक्रम घेण्यात आले. शिवाजी पेठ आणि मंगळवार पेठ मंडलाच्या वतीने बालकल्याण संकुल येथे सॅनिटरी नॅपकिन पद्मजा तिवले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

लक्ष्मीपुरी मंडलच्या वतीने यादवनगर येथे संघवी पोपटलाल शाह हॉस्पिटलच्या मार्फत रवींद्र वराळे यांच्या नेतृत्वाखाली मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरात जनरल चेकअप, पोटाच्या विकारांची तपासणी,उपचार आणि मोफत औषध वाटण्यात आले. उत्तरेश्वर पेठ मंडलतर्फे पंचगंगा हॉस्पिटलमध्ये महेश जाधव, विराज चिखलीकर यांच्या उपस्थितीत डॉ. विद्या काळे यांच्या नेतृत्वाखाली रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. राजारामपुरी मंडलतर्फे कापडी पिशव्याचे वाटप करत प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला.

ह्या वेळेस महिला आघाडी जिल्हाध्यक्षा गायत्री राऊत, मंगल निपाणीकर, कोमल देसाई, वंदना नाईकवाडे, निकिता यादव, किशोरी स्वामी, सुलभा मुजुमदार, राधिका कुलकर्णी, श्वेता कुलकर्णी, शुष्मा गर्दे, रजनी भुर्के, सुनीता सूर्यवंशी, रसिका साळोखे, दिपाली बगळे आदी उपस्थित होते.