खंडणीप्रकरणी भाजप नेत्याच्या पुत्राची चौकशी  

0
78

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्यांचे पुत्र नगरसेवक नील सोमय्या यांना मुलुंड पोलीस स्थानकात चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. एका जुन्या खंडणीप्रकरणी नील सोमय्या यांनी पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. तसेच मुलुंड पोलिसांकडून नील सोमय्या यांचा या गुन्हासंदर्भात जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. जवळपास तीन तास त्यांची चौकशी करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नील सोमय्या यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे की, गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने आपल्या दोन टॉवर्सचे काम एका ठेकेदाराला दिले होते. परंतु, नील सोमय्या यांनी ठेकेदाराला धमकावून ते काम आपल्या ओळखीतल्या एका ठेकेदाराला मिळवून दिले. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन लोकांना अटकही केली आहे.