‘२ हजार घ्या ; भाजप सोडून कुणालाही मत द्या..!’

भूमिपुत्राचं सुजय विखेंना सडेतोड उत्तर..!

0 86

अहमदनगर (प्रतिनिधी) : भाजपला मत देणार नसाल तर मोदी सरकारने दिलेले २ हजार परत करा, असे वक्तव्य करणाऱ्या खा. सुजय विखे-पाटील यांना एका शेतकऱ्याने सडेतोड उत्तर दिले आहे. या शेतकऱ्याने विखे यांना २ हजाराचा चेक पाठवत भाजप सोडून कुणालाही मतदान करण्यास सांगितले आहे. दत्ता ढगे असे त्यांचे नाव आहे. 

ढगे हे संगमनेर येथील शेतकरी आणि छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. शेतकऱ्यांची किंमत २ हजार रुपये ठरवणाऱ्या सुजय विखेंना हे माहीत असावं की आपण लोकशाहीत राहतो. लोकशाहीत सर्वांच्या मताला सारखीच किंमत आहे. आमच्या मताची किंमत २ हजार रुपये ठरवून तुम्ही आमचा जो अपमान केला आहे, तो कधीच क्षमा करण्यासारखा नाही. परंतु जर तुमच्याही मताची किंमत २ हजार रुपये असेल, तर आम्ही तुम्हाला रजिस्टर पोस्टाने २ हजार रुपयांचा चेक पाठवत आहोत. तो चेक घेऊन आपण कमळ या चिन्हाला सोडून कुणालाही मतदान करावे, अशा आशयाचे पत्रच लिहिले आहे.

शेतकऱ्यांनी सुजय विखेंना २ हजार रुपये देत त्यांच्याही मताची किंमत करावी आणि त्यांचे वडील आणि भाजपच्या इतर उमेदवारांना मतदान करू नये, असे आवाहन दत्ता ढगे यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही केले आहे.

कर्जत-जामखेड येथे झालेल्या सभेत सुजय विखेंनी भाजप नेते राम शिंदे यांच्या प्रचारसभेत भाजपला मत न देणाऱ्यांनी शेतकरी विम्याचे खात्यावर जमा झालेले २  हजार रुपये परत करावे. रोहित पवारांच्या सभेला जाणाऱ्या शेतकऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचे २ हजार रुपये चालतात, मग मोदींचं कमळ का चालत नाही, असे अजब वक्तव्य केले होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish.AcceptRead More