भाजप नेते दिलीप गांधी यांचे निधन

0
81

अहमदनगर (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी (वय ७०) यांचे आज (बुधवार) पहाटे निधन झाले. कोरोनाची लागण झाल्याने दिल्लीतील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.   

मागील काही दिवसांपासून गांधी दिल्लीत होती. मंगळवारी दुपारी त्यांना श्वसनाचा  त्रास जाणवू लागला. त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. परंतु प्रकृती अधिकच बिघडल्याने आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. अहमदनगर दक्षिणमधून ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.