बारामती : भाजप आपल्या मित्रपक्षाला हळूहळू संपवत आहे. शिवसेना आणि जेडीयूकडे बोट दाखवत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. वेळीच सावध होत नितीश कुमार यांनी शहाणपणाचा निर्णय घेतल्याचे शरद पवारांनी नमूद केले. ते आज बारामतीत पत्रकारांशी बोलत होते.

बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपसोबतची युती तोडल्याने राजकीय भूकंप आले आहे. त्यानंतर बोलताना शरद पवार म्हणाले की, जेपी नड्डा म्हणतायेत की, देशात फक्त भाजप हा एकच पक्ष शिल्लक राहील, छोटे-छोटे पक्ष संपतील. यातून एकच स्पष्ट होते की, नितीश कुमार यांची जी तक्रार आहे. त्यातून हे समजते ही भाजपला मित्रपक्षाला संपवायचे आहे, असे मत पवारांनी व्यक्त केले.

एकनाथ शिंदे यांनी नवा पक्ष काढून नवे चिन्हे घ्यावे. धनुष्यबान हे चिन्ह शिवसेनेचेच असल्याचे वक्तव्य पवारांनी केले. एखाद्या पक्षाचा चिन्ह काढून घेता येत नाही. एकनाथ शिंदे यांना वेगळी भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी आपला वेगळा पक्ष काढावे, असा सल्ला पवारांनी शिंदेंना दिला आहे.