भाजप सर्वांना पुरून उरली : चंद्रकांत पाटील

0
71

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्यांचा थयथयाट अपेक्षित आहे’ अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्राकांत पाटील यांनी शिवसेनेवर केली. 

महाविकास आघाडी सरकारला वर्षपूर्ण झाले आहे. वर्षपूर्तीनिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीतून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. यावर कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली. चंद्रकांत पाटील यांनी, दररोज वेगवेगळी विधानं करून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांना राऊत हेच जास्त प्रिय असल्याचे सांगितले.