कोल्हापूर (प्रतिनिधी) : यूपीएससी परीक्षा देण्याची इच्छा असेल तर तेच एकमात्र ध्येय डोळ्यासमोर ठेवून, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळते. परीक्षेच्या गराजांना समजून घेवून योग्य नियोजन करणे आणि त्यात सातत्य राखणे आवश्यक असते असे प्रतिपादन यूपीएससी परिक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी केले. यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे होते.

यावेळी चिकित्सक दृष्टीकोन ही परीक्षांची गरज असून शाळा, कॉलेजमधील गुणांपेक्षा तुमच्या व्यक्तिमत्त्वातील गुण हे या परीक्षेत पास होण्यासाठी अधिक आवश्यक ठरतात असे मत पास झालेल्या विद्यार्थ्यानी व्यक्त केले.

तसेच आ. चंद्रकांत पाटील यांच्या प्रेरणेने सारथी, बार्टी, प्रि-आयएएस ट्रेनिंग सेंटर इत्यादींच्या धर्तीवर विद्या प्रबोधिनी देखील यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना विशेष शिष्यवृत्ती देवू करत असल्याबद्दलची माहिती संस्थेचे संचालक राजकुमार पाटील यांनी दिली. यावेळी दीपस्तंभ फाउंडेशन जळगावचे यजुर्वेंद्र महाजन, आयकर उपायुक्त महेश लोंढे (आयआरएस) आदी उपस्थित होते.