भाजपाच्या वतीने गारगोटीतील एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप…

0
79

गारगोटी (प्रतिनिधी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांच्या सहयोगातून एसटी कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले जात आहे. मात्र, एसटी कर्मच्याऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम महाविकास आघाडी करीत असल्याचा आरोप भाजपाचे जिल्हा संघटनमंत्री नाथाजी पाटील यांनी केला. यावेळी गारगोटी एसटी आगारातील २३३ कर्मचाऱ्यांना जीवनावश्यक वस्तुंचे कीट वाटप करण्यात आले.

यावेळी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अलकेश कांदळकर, सरपंच संदेश भोपळे,  संतोष पाटील, राहूल चौगले, रणजित आडके, बाजीराव देसाई,प्रकाश वास्कर, बजरंग कुरळे, सुनिल तेली, भगवान शिदे, रमेश रायजादे आदी उपस्थित होते.