मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगूडमध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९६ वी जयंती साधेपणाने संपन्न करण्यात आली. यशवंत सेना, मुरगुड धनगर समाजाच्या वतीने येथील नगरपालिका सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांना कॉ. बबन बारदेस्कर यांच्या हस्ते  शंभर मास्क आणि सॅनिटाईझरचे वाटप करण्यात आले.

यावेळी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि त्यांच्या कार्याची माहिती आप्पाजी मेटकर यांनी करून दिली. यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा संघटक अमोल मेटकर आणि कागल तालुका यशवंतसेना उपाध्यक्ष सिद्धू दिवटे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते.

यावेळी राघू मेटकर, सुरेश दिवटे, विजय गोधडे, सुनिल दिवटे, मारुती दिवटे, अनिल मेटकर, विठ्ठल पडवळे, धनगर समाजाचे बांधव उपस्थित होते.