वाशीतील बिरदेव जळ यात्रा रद्द

0
2203

राशिवडे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील वाशी येथील प्रसिद्ध बिरदेव जळ यात्रा कोरोनामुळे रद्द करण्यात आली. ही यात्रा १४ मार्चला होणार होती. पण कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी ग्रामपंचायतीने दर तीन वर्षानी होणारी ही यात्रा न करण्याचा निर्णय घेतला आहे.


दर तीन वर्षानंतर जळ यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरत असते. कर्नाटक, आंध्र, गोवा, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यांमधून पाच लाखांवर भाविक उपस्थित राहतात. कोरोना संकटामुळे राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊनचा इशारा दिला आहे. त्यापार्श्वभूमीवर येथील ग्रामस्थांनी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बाहेरच्या राज्यातील भाविक भक्तांना प्रवेश देण्यात येणार नाही. गावातील माघारनिनासुद्धा प्रवेश द्यायचा नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी परिसरातील १ किलोमीटर अंतरावरील परिसर सील करावा, अशी मागणी प्रशासनाकडे करणार असल्याची माहिती पदाधिकऱ्यांनी दिली. यात्रा काळात धार्मिक विधी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. यावेळी सरपंच गीता लोहार, उपसरपंच संगीता पाटील, ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, धनगर समाज बांधव, ग्रामस्थ  उपस्थित होते.