मुंबई (प्रतिनिधी) :  आजवर अनेक कलाकार, राजकारणी आणि क्रीडा विश्वातील लोकांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट आले आहेत. अशा प्रकारच्या बायोपिकला प्रेक्षकांचीही पसंतीही मिळत आहे. एमएस धोनी, एमसी मेरी कॉम, संदीप सिंग आणि मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.  आता चेस मास्टर विश्वनाथन आनंद यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच येणार आहे. विश्वनाथन आनंद  यांनी बुद्धिबळाच्या जगात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

आतापर्यंत 5 वेळा विश्वविजेतेपद जिंकलेल्या विश्वनाथन आनंद यांनीही बायोपिक बनवण्यास सहमती दर्शविली आहे. आनंज एल राय या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आनंद यांनी यापूर्वी ‘तनु वेड्स मनु’, ‘रझाना’ आणि ‘झिरो’ असे चित्रपट केले आहेत. सध्या ते अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांच्यासमवेत अतरंगी रे चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत.