‘बिंबा’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
251

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मुंबईतील कामरूप क्रिएशनची निर्मिती असलेली ‘बिंबा’ ही वेबसिरीज पिंगपाँग इंटरटेनमेंट चॅनलच्या माध्यमातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एका मानसिक विकृती तरुणाच्या कारस्थानावर आधारलेली ही वेबसिरीज ६ एपिसोडमध्ये पाहावयास मिळणार असल्याची माहिती निर्माते जीवन जाधव यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत दिली.

‘बिंबा’ हा संस्कृत शब्द आहे. बिंबा म्हणजे रंग बदलणारा सरडा. या वेबसिरिजमध्ये एका मानसिक विकृती असलेल्या तरूणाची कारस्थाने दाखविण्यात आली आहेत. त्याचबरोबर यातील प्रणय, भय, थरार अशा दृश्यांनी प्रेक्षक खिळून राहतील.  वेबसिरीजचे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यामध्ये शूटिंग झाले आहे. मिलिंद संकपाळ यांनी दिग्दर्शन केले आहे. तर जीवन जाधव, भरत कलिथा यांची निर्मिती आहे. राहुल डोर्ले यांनी लेखन केले आहे. निशांत भागवत यांनी छायांकन केले आहे. अनिकेत विश्वासराव, युविका चौधरी प्रमुख भूमिकेत असून राहुल सिंग यांनी विशेष भूमिका साकारली आहे.