‘बिग बॉस’ फेम बेळगावकर अभिनेत्री विवाहबंधनात

0
155

बेळगाव (प्रतिनिधी) : बिग बॉस फेम आणि येथील अभिनेत्री सई लोकूर विवाह बंधनात अडकली. मराठमोळ्या सईने तीर्थदीप रॉयसोबत लगीनगाठ बांधली. सईने या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सईच्या या विवाहसोहळ्याची चर्चेला उधाण आले होते.

सई आणि तिर्थदीप यांचा विवाहसोहळा बेळगावात पार पडत आहे. या सोहळव्यातील अनेक विधींचे फोटो सईने शेअर केले आहेत. सईने शेअर केलेल्या या फोटोत तिचा मराठमोळा लूक पाहायला मिळत आहे. यावेळी सईने नाकात नथ, केसात गजरा, गळ्यात मोत्यांची माळ, कपाळावर चंद्रकोर असा सुंदर मराठमोळा लूक केला आहे.