Published June 2, 2023

कोल्हापूर ( प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज कोल्हापूरमधील मार्केट यार्ड येथे पार पडला. या मेळाव्यामतील उपस्थितांना संबोधित करताना कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार हसन मुश्रीफ यांनी आता मेव्हण्या-पावण्याचं सगळं मिटलयं त्यामुळे कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला द्यावी आम्ही निवडूण आणल्याखेरीज थांबणार नाही असं म्हटलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आमदार मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विधानसभा आणि लोकसभेच्या कोणी लढवल्या आणि सध्य स्थितीत त्या अबाधित ठेवल्या याचा लेखाजोखा मांडला व उद्धव ठाकरे साहेब यांना समजावून सांगितले पाहिजे की, कोल्हापूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात यावी. ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास आपण जिंकू शकतो असा दावाही त्यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना मुश्रीफ म्हणाले की, सध्या सरकार चुकीचे काम करत असल्याने त्याची माहिती नागरिकांना द्यावी. सगळ्या निवडणुका या दिवाळीनंतर होणार असल्याने आता फक्त माणसं जोडण्याचं काम करावं. जोपर्यंत लोकांची सेवा करणार नाही, तोपर्यंत नागरिक आपल्याशी जोडले जाणार नाहीत असेही ते यावेळी म्हणाले. त्याबरोबरचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी उपक्रम हातात घेतला आहे, पण बदलीसाठी अधिकारी दोन दोन कोटी मोजत असेल, तर शासन आपल्या दारी न्या नाही तर बेडरूममध्ये न्या काही बदल होणार नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी बोलताना लगावला.

September 23, 2023
September 23, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023
September 22, 2023